राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद का व्हावे?
राष्ट्रीय चर्मकार महासंघ हि देशातील सर्वात मोठी चर्मकार संघटना आहे. चर्मकार समाजातील इतर संघटनांचे नेते हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पूर्वीचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांचे जाळे हे महाराष्ट्रातील आणि देशातील खेडो-पाडयापर्यंत पोहचलेले आहे महाराष्ट्रात तर गाव शाखा व घरागणीस संघटना पोहचली आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्वोच्च नेते हे महाराष्ट्रातील राजकारणाच्या पटलावरील मंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री म्हणून मा. श्री. बबनराव (नाना) घोलप हे नाव तळागाळातील बांधवांपर्यंत ज्ञात आहे. एखाद्याचे शासकीय पातळीवरील कोणतेही काम असेल तर फक्त “बबनराव घोलप” या एका नावावरून केले जाते. समाजाला अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे, समाजाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरलेले, अनेक योजनांचे निर्माते व संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवून त्याचा विस्तार करणारे एकमेव मंत्री म्हणून नानासाहेब घोलप हेच आहेत.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ हि अशी एकच संघटना आहे. ज्यांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्याची संख्या लाखात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय / राज्य / जिल्हा / व तालुका पदाधिकारी मिळून ३५०० पेक्षा अधिक पदाधिकारी आहेत.
कोणत्याही खेडेगावात जरी अन्याय, अत्याचाराची घटना घडली तर तत्काळ त्या ठिकाणी पदाधिकारी पोहचणारी एकमेव संघटना म्हणजेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ!
तळागाळातील कोणत्याही बांधवांला शासकीय लाभ मिळवून द्यायचा असेल तर तो मिळवून देणारी देशातील एकमेव संघटना म्हणजे "राष्ट्रीय चर्मकार महासंघ."
सभासदत्व आणि सभासदांची कर्तव्य
एकावन्न रुपये भरून कोणीही, कोणत्याही कारणाने चर्मोद्योगाशी संबंधित १८ वर्षांवरील भारतीय नागरिकास सभासद होण्यासाठी अर्ज करता येईल. तथापि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नियम तत्वे व उदिष्टे त्यास मान्य असावी लागतील व त्यानुसार त्याने कर्तव्य म्हणून तसे वर्तन करणे बंधनकारक असेल.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या