Loading

मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या बद्दल

कला क्षेत्रातील कार्याबद्दल

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव (नाना) घोलप अर्थात सर्वांचे लाडके "नाना" हे जरी आज राजकारणात व समाजकारणात व्यस्त असले तरी त्यांच्यात एक हरहुन्नरी कलाकार आहे. ते स्वतः कलावंत आहेत हे अनेकांना माहिती नसेल. मात्र त्यांनी युवा असतानाच अनेक नाटकांमध्ये, नाट्य कार्यक्रमांमध्ये लोक कलावंत म्हणून विविध भूमिका साकारल्या आहेत.

एक अस्सल कलावंत म्हणून नानांनी वेगवेगळ्या भूमिका स्वतः साकारल्या असून कितीतरी चित्रपट व नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. निलांबरी, शेगावीचा राणा गजानन, मेरी मर्जी, सत्य साईबाबा या चित्रपटाची निर्मिती नानांनी केली असून, राजा शिव छत्रपती या सह्याद्री वाहिनी वरील प्रदर्शित झालेल्या मालिकेचे देखील निर्माते आहेत तसेच निलांबरी, अष्टभुजा सप्तशृंगी माता, शेगावीचा राणा गजानन, अत्तराचा फाया, जय वैभव लक्ष्मी माता, वंशवेल, घरंदाज, श्री सत्य साईबाबा, नागराज तुझा भाऊ राया, बाप माणूस, संसार माझा सोन्याचा, विडा एक संघर्ष, शाहू महाराज मालिका अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच कितीतरी वग, नाटक व लावण्यांचा कार्यक्रम त्यांनी व्यासपीठावर गाजवला आहे. नुकताच त्यांचा सत्य साईबाबांच्या जीवनावरील महत्वाकांक्षी चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत असून त्यामध्ये सुद्धा एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका त्यांनी साकारलेली आहे. त्या भूमिकेचं वैशिष्ट्य असे की, ती भूमिका साकारताना हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे मोठे कलाकार जॅकी श्रॉफ यांच्या सोबतचे त्यांचे सीन दमदार असे वाटले. मुरलेल्या कलाकारासमोर अगदी सहजतेने वावरून नानांनी ते अभिनयात किती मातब्बर आहेत हेच सिद्ध केले.

सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव (नाना) घोलप अर्थात सर्वांचे लाडके "नाना" हे जरी आज राजकारणात व्यस्त असले तरी त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे. ते स्वतः एक कलावंत देखीलआहेत.

सुरुवातीला पोटापाण्याचा भाग म्हणून अनेक ठिकाणी लोककलावंत म्हणून काम करीत असताना कुठेही अन्याय दिसला की लाथ मारण्याचा स्वभाव असल्याने साहजिकच सामाजिक जाणिव जिवंत असल्याचे लक्षण होते. नानांचा मूळ पिंड हा समाजसेवेचा असल्याने संघर्ष, अन्यायाविरुद्ध बंड हे ठरलेलेच!

अगदी लहानपणापासून गरिबीचे चटके खाल्ल्याने, सामाजिक झळ पचविल्याने व जगण्यासाठी संघर्ष केल्याने एका छोट्याश्या गावचे बबन हळू हळू बबनराव झाले. आणि समाजाची निस्सीम सेवा करत एके दिवशी सर्वांचेच प्रेमळ, लाडके नाना झाले. नानांच्या समाजसेवेमुळेच प्रभावित होऊन महाराष्ट्राचा वाघ असलेले मा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःहून पत्र पाठवून त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ केली. लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून नानांना दिली. आणि नानांनी देखील त्या संधीचं सोनं केलं.

शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी नानांना समाजकल्याण मंत्री बनवून आपल्या समाजाची सेवा करण्याची जी संधी दिली त्या संधीचा उपयोग करत नानांनी सर्वप्रथम विखुरलेला आपला समाज एकत्र केला. सत्तेत असणारा कुणीही नेता ठराविक एका समाजाची मोट बांधत नसतो, कारण त्याला पुढची निवडणूक लढवायची आणि जिंकायची असते. परंतु नानांनी याच गोष्टीला फाटा देत प्रथम आपला चर्मकार समाज एकत्र केला. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. कारण अशा गोष्टीला धाडस लागतं.

नामदार बबनराव उर्फ नानासाहेब घोलप या धडाकेबाज समाजकल्याण मंत्री असलेल्या चर्मकार नेत्याने एका झटक्यात समाज गोळा केला. छोट्या - मोठ्या २०० संघटना विसर्जित करून महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. पुढे याच संघटनेचा विस्तार करीत देशपातळीवर नेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघाची गुढी रोवली. आज या संघटनेचे देशपातळीवर हजारो पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाडी पोहोचलेली संघटना म्हणून आजही लौकिक आहे.

राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव (नाना) घोलप अर्थात सर्वांचे लाडके "नाना" हे जरी आज समाजकारणात व्यस्त असले तरी त्यांनी राजकारणात असताना मारलेली मोठी भरारी महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहण्यासारखी आहे.

एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा विधानसभा जिंकलेली व्यक्ती म्हणजे नाना! पहिल्या विधानसभेतच डायरेक्ट मंत्री म्हणून गळ्यात माळ पडलेल्या भाग्यवंतांपैकी एक म्हणजे नाना! मंत्री म्हणून महाराष्ट्रभर दौरा करून आपला समाज एकत्र करणारा एकमेव नेता म्हणजेच नाना!

महाराष्ट्राची महत्वाची खाती अर्थात महिला व बालकल्याण, समाजकल्याण व माजी सैनिकांचे कल्याण अशा खात्यांचा मंत्री म्हणून नानांनी जगात पाहिले महिलांसाठी ३३% आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडले. चीन या देशाच्या बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री ठरले. खत्री आयोगाची स्थापना, भटक्या जमातीची अ, ब, क, ड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे पहिले मंत्री ठरले. कास्ट व्हॅलिडीटी चे जनक हे नानाच आहेत. याचबरोबर समाजाला शासनाच्या माध्यमातून ३५० आश्रम शाळा, ३०० वसतिगृहे, ६ सूतगिरण्या व ४०० वृद्धाश्रम हे नानांनी दिले.

राबिवलेल्या योजना

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, क्रांतिकारी नेते, चर्मकार हृदयसम्राट मा. श्री. बबनराव (नाना) घोलप हे महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण मंत्री असताना त्यांच्या अधिकारा खाली गठीत केलेल्या योजना/अमलात आणलेल्या योजना व इतर शासकीय योजना खालील डॉक्युमेंट मध्ये उपलब्ध आहेत:
राबविण्यात आलेल्या योजना.pdf

लीडकॉम महामंडळामार्फत राबविण्यात आलेल्या योजना:
लीडकॉम महामंडळामार्फत राबविण्यात आलेल्या योजना.pdf

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या